Friday, July 22, 2016

तुझ्याचसाठी वेडी... काळूबाई


तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करण्याची संधी तु दिलीस त्यासाठी धन्यवाद... आता हे धन्यवाद वगैरे तुला नौटंकी वाटेल माझी.... पण तुला धन्यवाद म्हणायचे कारण काय माहित आहे का? की मी आतापर्यंत कोणत्याच मुलाच्या प्रेमाला होकार दिला नाही कारण मी माझ्या नजरेसमोरुन तुला कधीच जाउ दिले नाही. प्रेमाचा भास, प्रेमाचा शोध तुझ्यापर्यंतच येऊन केव्हांचा थांबला. तुझ्यात इतके गुंतत चालेय की माझ्यातच ‘तु’ आहे याचा भास होतो कधी कधी.. माझी मैत्रीण बोलते पण ...तु ना अभी के जैसे बात कर रही है... पण अभी तुला माहित आहे का ? ना टाइमपास साठी कोणाशी बोलले, ना कोणाशी टाईमपास करावा असं वाटलं... तुझ्यावर एकतर्फी प्रेम करताना खूप सुखी आणि समाधानी आहे मी.. यार कोणा फालतू मुलाला हो बोलून माझ्याच फिलिंगशी आणि मग त्याच्या फिंलींगशी खेळण्याची हिंमत माझ्यात कधी आली नाही. आणि येणार पण नाही... तुझ्या बरोबर घालवलेला प्रत्येक वेळ हा माझ्यासाठी 1st Time Experience  होता... आणि आता परत मी दुसऱ्याबरोबर तेच पुन्हा फ़िलिंगस शेअर नाहीच करु शकत.. पुन्हा पुन्हा तुच आठवत राहणार आणि मग मलाच त्रास होणार.. म्हणून नकोच आता कोणी लाईफमध्ये.... मी एकटी आहे पण तुझ्या आठवणीसोबत... एकदम सुखी ....

यार तु ना कसला भारी आहेस ना माहित नाही तुला... आणि मला कळलय पण शब्दच नाहीत तुला ते सांगायला.... बस तेरे ना मैं भी मैने धुंड ली है अपनी खुशी.... लव्ह यु फॉरएव्हर कालू.... 


अकेले है तो क्या गम है.. तेरी यादें साथ है.... 

अभी तु ...


माझ्या भावना समजायला तुला कधीच वेळ नव्ह्ता ना...

ध्येच मला एकटं सोडून जाताना, एकदा तू विचार करायला हवा होतास.

तुझ्यासाठी जुनं असेल हे सगळं, माझ्या साठी तर हा नवा खेळ होता ना...





मिस यु Forever @Abhi      







Friday, July 8, 2016

"के ‘अभी’ दिल भरा नही" - एक लव्ह स्टोरी

 माझ्या पुस्तकाचा ‘कव्हर फोटो’ 
काही हरवलं की काहीतरी नवं मिळत, काही वाट्या बंद झाल्या की नव्या वाटा अपोआपच निघतात. तु गेलास पण त्या बदल्यात ना मला काही नवीन मिळालं ना नवीन वाट.. खरतरं शोधलच नाही असं काही मी.... तु हरवलास माझ्या आयुष्यातुन आणि सगळं गणितचं बिघडलं आयुष्याचं. प्रयत्न केला शंभर टक्के तुला पुन्हा मिळविण्याचा पण तो प्रयत्न नेहमीप्रमाने असफलच झाला कारण आता तु तो नव्हतास ना ज्याने काही क्षणासाठी का होईना माझ्यावर प्रेम केलं होत. असो पण तुझ्या आठवणीसोबत राहण्याचा माझा निर्णय बदलला नाही मी... आणि या आठवणीतच मी तुझ्याशी बोलते, हसतेहवं ते करते... तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण जगले होते आणि आता त्या आठणीच मला जगू देतायेत. 

मी आपल्याबद्दल लिहित असते ते तुझ्या पर्यंत पोहचतं की नाही माहित नाही पण जेव्हा पण लिहिते तेव्हा खूप शांत वाटते मला.. तुझ्याशी खूप गप्पा मरल्याचा भास होतो. काही मिनिटांचा असतो हा भास पण पुढचं लिखाण लिहिण्यापर्यंतचा पुरेसा असतो.

तुला गम्मत माहित आहे का ? मी जे काही लिहिते फक्त तुझ्याशी बोलण्यासाठी... पण काही लोकं माझा ब्लॉग वाचतात आणि त्यांना विशेष म्हणजे माझं लिखाण खूप आवडतं. मी असच लिहित राहावं. खूप लोकं बोले स्टोरी खूप मस्त आहे... वाचताना खूप काही फिल होतं... पुस्तक लिहिण्याबद्दल पण सांगतात मला.. माझा लिखाण ललित लेखनामध्ये येतं हे मला माझ्या वाचकाकडून कळालं... भारी ना !

आता ठरलं रे... माझं आपल्या स्टोरीवर एक भारी मराठी लव्ह स्टोरी पुस्तक लिहायचंच.. आणि खर तरं आता माझी तिच नवी ओळख असेल. एक लेखिका म्हणून....हीच आहे आता माझी नवी वाट जगण्याची... "के अभी दिल भरा नही" असं नाव सुचलयं मला... अजून काही नवीन सुचलं की दुसरं काहीतरी ठेवेन नाव... अजुन एक गम्मत माहित आहे का.. तुझ्या यावेळच्या वाढदिवसाला मी रिलिझ करेन नक्की.. सगळं काही फक्त तुझ्यासाठी... भारीवाला फिलींग आहे तुझ्यावर असच प्रेम करण्याचं...  


मिस यु Forever @Abhi      

Monday, June 13, 2016

डीपी... लास्ट सिन ...लाईफ


तुला विसरण्याच्या नादात स्वतःला विसरत चालेय मी. यार तु लवकर लग्न कर म्हणजे मला पण कोणत्याही मुलाला हो बोलून सेटल व्हायला बरं आहे. आई तर रोज डोकं खाते माझें मुलं बघ मुलं बघ... तुझं नाव तर निघतच त्यात ’तो’ मुलगा चांगला होता... मग मीच आईला बोलते त्याचं नाव पण काढू नकोस , नाही आवडत मला. अरे यार ज्याच्याशी लग्न करायला जीव जळतोय त्याच्याच साठी आईसमोर नाही म्हणायला कसली लागते माझं मलाच माहित. खरचं किती सहजतेने तु माझा होतास पण किती सहजतेने तु आता माझा नाहीस. तुला खरचं कोणी आवडत असेल की नाही मला कल्पना नाही. मी पिडायचे म्हणून पण तु मला असं सांगितलं अशील असं खूप वाटते.  पण मी तुला त्रास देणार नाही असं म्हणून जाम मोठी चूक केली असं वाटतं मला कधी कधी. ओय कालू सेल्फी पाठव ना असं बोलण्याचं तर जाम मन करतं ... तुझे आजकालचे डिपी तर कडक भारी, झक्कास असतात.रोज सकाळी तुझं लास्ट सीन ६.५७ पाहून-डिपी पाहूनच होते. आयुष्य आता हेच करण्यात जाणार बहुतेक. यार जितकं दूर जातेय तितकी गुंतत जातेय मी. खडूस आहेस तु खूप पण... मिस्स यु खूप खूप रे.... 

Miss u @Abhi Forever 

Wednesday, June 8, 2016

जिंदा हु यार काफी है...


अवघड आहे खूप तुला विसरणं...जगणं तर आहे पण त्याला अर्थ नाही, जिंदा हु यार काफ़ी है..असं काहीसं झालय...तुझ्या सोबत होते तेव्हा प्रेमचा खरा अर्थ माहित नव्ह्ता...नक्की काय असतं? तु खूप खूप आवडायचास आणि तुझ्यासाठी काही ही करायची तयारी मनाची नेहमीच असायची आणि तेच माझं प्रेम असं मी समजायचे... पण आजकाल तर नव्याने मी तुझ्या प्रेमात पडतेय, तुझ्या प्रत्येक गोष्टीची आठवण डोळ्यात पाणी आणतेच... माहीत नाही खूपच हळवी झालेय तुला घेउन... तु जसा आहेस तसा फक्त माझा आहे... निदान माझ्या आठवणींमध्ये तरी... रागाने सगळ्या आठवणी लॅपटॉप मधून तर डिलीट तर मारल्या पण यार मनात आणि डोक्यात ज्या आठवणी आहेत त्या कशा घालवू... मेरा मन केहने लगा, पास आके दूर मत जा.... हे गाणं सारखं सारखं एकते.... गवाह है ये आसमां.. गवाह है ये समा...किसी को न चाहा कभी तुम्हारे सिवा.. या तु पाठविलेल्या गाण्याच्या ओळी तर मला रोज रोज तुझ्या प्रेमात पडायला भाग पाडतात... तुझा चेहरा डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही...
काल एका मैत्रीणीला बोले मी यार मुझे जिने नही हो रहा... उसकी काफ़ी याद आ रही है... ती मला बोली, उसके बुराईयो को याद कर कम तकलिफ होगी तुझे... मला ती भारी काहीतरी बोली... ”याद सिर्फ याद बनकें रहे तो अच्छा है, जिंदगी मैं हर चीझ नही मिलती”... काय बोलू तिला मला ही नाही कळाले.. त्याच्या आठवणी मध्ये स्वतःला गमावून बसलेय मी याची जाणिव ती मला सतत करुन देते पण मला नाही समजत आहे.... खरचं अभी लाईफ तुझ्यासोबतची हवी.. नाहीतर ती असून नसल्यासारखी आहे.

मिस यु खूप खूप..आणि हुप हुप... आभाळाइतकं मिस करतेय.... 

Friday, May 27, 2016

तु नही तेरी यादें ही सही ...

नाही जमत मला तुला विसरणं.. आणि मी का जबरदस्ती विसरु तुला... तुला नाही करायचं माझ्यावर प्रेम तर नको करुस, पण मी तर करुच शकते ना तुझ्यावर.... अपेक्षा ठेवून प्रेम करण्यात पण मजा नाही ना? सो तु नसलास तरी तुझ्या आठवणी आहेतच की प्रेमात पडायला पुन्हा पुन्हा....

अगर तुम्हे पा लेते तो किस्सा इसी जन्म मे खत्म हो जाता..! 
तुम्हे खोया है तो यक़ीनन कहानी लम्बी चलेगी..!!


















Miss U @Abhi Forever .... 

Wednesday, May 25, 2016

ख्वाहिश...

मेरी तो बस इतनी सी ख्वाहिश है..
तेरी कोई ख्वाहिश अधूरी ना रहे....



Monday, May 23, 2016

अखेर खेळ संपला....

आज पासून त्याची वाट पाहणं थांबलं... तो खूप सहजपणे बोलला .. मला कोणीतरी दुसरी मुलगी आवडते.... झाला ना खेळ खल्लास.... 
खरं तर खूप दिवसानंतर मनाची शांती झाली... माझी वाट बघणं थांबणार होतं आता.... त्याला काही फिल झालं असेल की नाही महित नाही ... पण आज खूप वर्षानंतर आई ला घट्ट मिठी मारुन रडायाची इच्छा झाली. आजही एकटचं स्वतःला सावरावं लागलं. शेवटी काय कोणाला कितीही जीव लावला की असचं होतं . जीव ओवाळून टाकायला पण मन लागतं पण त्याला काय कळणार म्हणा जीव लावणं काय असतं....
का माहित नाही जगात हा एकमेव माणूस असेल की ज्याच्यासाठी माझ्या ओठांवर कधीच शिवी आली नाही की, यार त्याचं वाईट व्हावं असं नाही वाटलं.... आज मला म्हणाला ‘तुला काही सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाह’... चटकन पाणी आलं त्याचं हे वाक्य एकून ... माझा माज आजून त्याने तर पाहिलाच नव्हता... कोणत्याही मुलाला समोर कधी उभा केला नाही, कोणाची चांगलीच उतरवायची माझ्याकडून शिकावं आणि कधी कोणाच्या बापाचा एकून घेतलं नव्ह्तं .. पण हा ‘हिरो’ एकमेव जो मला सांगतोय .... असो... माझी चूकी फक्त आणि फक्त प्रेमच दाखवलं मी त्याला... कसा कळणार त्याला तरी मी कोण? (त्याच्यासाथी अर्थात मी फालतू आहे) .  आज एकच दुखः झालं त्याला मी तेव्हाही त्याच्या सुखासाठीच सोडलं आणि आज ही कायमचं विचार सोडला तेही त्याच्या सुखासाठी पण त्याला तेव्हाही नाही कळाले माझे वागणे आणि आजही....  

असो तु हॅपी मी हॅपी.... 

Bye @abhI Forever 



            

Thursday, May 19, 2016

आठवण म्हणजे फक्त `तु’

वादळापूर्वीची शांतता जशी असते ना तसा आजचा दिवस होता...भावनेच्या भरात मनात जे आहे ते बोले मी त्याला.... नाहीच राहू शकत तुझ्याशिवाय.. मला तुझ्याशी लग्न करायाचं आहे... असं मी डायरेक्ट त्याला बोले... बापरे दोन मिनटं तर मीच हैराण झाले मी काय बोलतेय... पण हे सगळं त्याला मी नव्ह्ते बोलत. माझ्या त्याच्यासाठी असणाऱ्या भावना, प्रेम, माझं मन त्याच्याशिवाय किती एकटं आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत होतं.  काल त्याच्याशी बोले तर मला म्हणाला नको ना असं वागू.. मला टेंशन येतं ... आत त्याला आपल्याशी बोलून आपल्या भावना समजून घ्यायला टेंशन येते असेल तर मी त्याला टेंशन नाही द्याला पाहिजे ना...भले मी कितीही टेंशन मध्ये असले तरी ...  आपण ज्याला जीव लावतो त्याला त्रास व्हावा असं कधीच वाटत नाही ना आपल्याला.   आजपासून तुला त्रास नाही द्यायचा असं ठरवलं आहे. ना मी तुझी आठवण काढणार नाही मी तुला काही बोलणार... झालं तर मग डन.....

मनात तुझ्या आठवनीचे ढग हळू हळू भरलेले होतेच, त्याला पूर्णपणे मोकळं व्ह्यायला तू ही कधी संधी दिली नाहीस आणि मी सुद्धा त्या आठवनीतून बाहेर पडले नाही. पावसाळा जवळ आल्याने वातावरण ना थंड ना गरम असं झालयं .. पण काल अचानक घरी जाताना एक पावसाचा थेंब माझ्या गालावर पडला... या वर्षीचा पहिला "थेंब" ... आणि तुला खरं नाही वाटणार... मी गाणी एकत होते, एक क्षणात ते गाणं लागलं जे तु मला पाठवलं होतसं ... आई शप्पत माझ्या चेहऱ्यावर जी स्माईल आली ना .. गेल्या काही दिवसात नवह्ती ती परत आली होती... तुला आठवायचं नाही म्हणालं की बघ असं होतं माझ्या सोबत.....
ते गाणं कोणतं होतं माहित आहे का....


Saajani, nabhaat nabh daatun ale
kaaware man he jhaale, tu ye naa saajani 

salasalato waaraa, gaar gaar haa shahaaraa
laahi laahi dharatilaa, chinb chinb de kinaaraa 
tujhyaa chaahulinn othhi yeti gaane 

saajani, chhalato maj haa mridgndh 
tujhyaa sparshaasam dhund, tu ye naa saajani 

rimajhim rimajhim yaa naadaan paayi, shiwaar jhaaln bebhaan 
saye bhijuyaa raanaat manaat paanaat hasu de sonyaachn paani 

hurahur laagi jiwaa nako dhaadu gn saangaawaa 
ye naa ataa barasat ye naa 
gunagunate  hi maati, lawalawate hi paati 
sar barase sayinchi rujawaayaa nawi naati 
tujhyaa chaahulinn othhi yeti gaani 

- Miss U.. @abhI Forever 

सहजच

किती सोपं आहे तुझ्यासाठी न बोलनं माझ्याशी...
किती अवघड आहे माझ्यासाठी न बोलनं तुझ्याशी...

किती सहजच तुझी आठवण येते मला...
किती सहजच तु विसरुन गेला मला...

किती सहजच माझ्या प्रत्येक श्वासात तु आहेस
किती सहजच तुझ्या रागात फक्त मी आहे...

किती सहजच विश्वास मोडलास माझा
किती सहजच विश्वास ठेवलाय मी पुन्हा तुझ्यावरच...

किती सहजच... मी नाही विचार करु शकत तुझ्याशिवाय माझ्या जगण्याचा...

@abhI ... Miss U Forever


Monday, March 28, 2016

पाकिट हरवल्याचं दुःख...बरच काही मिळाल्याचा आनंद

                       पाकिट हरवल्याचं दुःख...बरच काही मिळाल्याचा आनंद 
स्तु आणि माणसांची नाती एकदा हरवली की ती पुन्हा मिळणं फारच कठीण होऊन बसतं आणि 
हरवलेलं आणि मिळालेलं माझं पाकिट
जर हरवलेली नाती नव्याने पुन्हा मिळाली की मग काय त्या आनंदाला मोलच नसते. असंच माझं काहीसं झालं... हरवलेलं कोणतही नातं नाही तर माझी हरवलेलं पकिट मला मिळाले.  वस्तु हरवल्या की आपण हळहळण्य़ाशिवाय काही करुच शकत नाही कारण आता ती आपल्याला पुन्हा नाहीच मिळणार यावर आपण ठाम असतो. शुक्रवारी ऑफिसवरुन घरी जाताना मुंलुड मधल्या एच.डी.एफ.सी च्या ATM मध्ये रात्री साडेदहाच्या सुमारास मी गेले होते आणि पाकिट मी ATM  मशीनव ठेवले, कार्ड चा काम झाला आणि कार्ड पर्स मध्ये न ठेवता मी हातात फक्त कार्ड घेउन गडबडीत ATM मधून बाहेर पडले. खूपच हेक्टिक कामाच्या शेडुल्ड्मुळे खूपच दमले, दिवसभर ऑफिस..मग मनीषाला बघायला हॉस्पिटल...डोक्यात विचारांचा काहूर... मी माझ्याच धुंदित घरी आले. मस्त जेवण करुन झोपले. सकाळी ११ च्या दरम्यान जाग आली.. शनिवार म्हणजे सुट्टीचा दिवस आरामात उठले , मोबाईल पाहिला तर युक्ती च्या ग्रुपवर प्रमोद ने एक इमेज पाठवली होती आणि लिहिला होता अर्चाना तुझा प्रेसकार्ड कोणालातरी मुंलुड स्टेशनला सापडला आहे. अर्धवट डोळे उघडत इमेज पाहिली तर आयला माझा कार्ड... झटकन झोपच कुठे उडाली कळालंच नाही... मी मंद मग आठवायला लागले कसं काय पडलं असेल कार्ड... मी तर पर्स ओपन नव्हती केली स्टेशनला... काल काय काय झाला आठवण्याचा प्रयत्न करायला लागले तर लेट ट्युब पेटली माझी... आई शप्पत मी माझा पाकिट ATM मध्ये विसरलेच की... पट्कन पर्स चेक केली तर त्यात नव्ह्तचं की माझं पाकिट... च्याला आता चोराने तर सगळं सामान असंच रस्स्त्यावर फेकला असेल.. गेलं की माझं पाकिट.. मनाची हळहळ तर झालीच दोन मिनीटासाठी तर मी सुन्नच झाले होते... काय काय होतं त्या पाकिटामध्ये हेच आठवेना... मग डेबीट कार्ड , क्रेडीट कार्ड होतेच माझ्याकडेच त्यामुळे जरा हलकसं वाटलं... प्रमोदला मेसेज केले की कोणाला मिळालं आणि ही इमेज कोणी पाठ्वली... आपल्याच मिडीयातल्या मृत्युंजयने माझ्या कार्डची इमेज एका ग्रूपवर शेअर केली होती.. ये लडकी अपने जर्नालिझम डिपार्टंमेंटकी है ना... प्रमोदने मृत्युंजयचा नंबर मला दिला आणि बोल त्याच्याशी म्हणाला. त्याला फोन लावला पण बिझी येत होता सारखा. पण मग लागला आणि मृत्युंजयशी बोलणं झालं त्याने सांगितलं अजित सरके दोस्त को मिला है... अजित सर का नंबर मेसेज करता हू बात करले. अजित सरचा नंबर तर होता माझ्याकडॆ त्यामुळे त्याचे धन्यवाद मग फेसबुक चेक करत होते  तर मला मेसेज होते दोन रात्री ११ च्या सुमारास आलेले. एक मृत्युंजयचा आणि दुसरा अजित मांढरे सरांचा... अरे तुझा पाकिट हरवला आहे का ? माज्या एका मित्राला मुंलुंडला मिळाले आहे. हाआआआ... मेसेज बघून इतकं बरं वाटलं ना की शब्दच नाहीयेत माझ्याकडे आता लिहायला. यार आहे कोणाकडे तरी माझा पाकीट त्यामुळे मी खूष झाले. काय गम्मत झाली ना .. पाकिट हरवलं आणि ते मिळाल्याचा मेसेज पण मला अकराच्या सुमारास एफबीवर आला. माझ्या जुन्या प्रेसच्या कार्ड्मुळे हरलेलं पाकिट मिळालं असं म्हणायला ही काही हरकत नाही कारण माझं कार्ड पाहूनच ज्या व्यक्तीला म्हणजे आदित्य काळे यांना मिळालेलं होतं ते मित्र होते अजित सरांचे... कार्ड पाहून त्यांनी अजित सरांशी संपर्क साधला. आणि त्यानंतर बाकी सगळं रामायण झालं...सरांचा तो मित्र म्हणजे आदित्या काळेशी मी संपर्क केला. या आदित्य काळेची पण कमाल आहे खूप चांगलं काम केलं त्यांनी आणि त्याच्या प्रामाणिकपण तर आवडलाच. त्यानी मुलंड पोलिस स्टेशनला हवलदार शिंदे यांच्याकडे माझा पाकिट दिलं. तिथेच त्यांनी माझ्या पकिटात असणाऱ्या माझ्या फोन नंबर वर किमान पन्नासतरी कॉल केले. पण घरी माझ्या कोणत्याच नंबरवर नेटवर्क नसल्यामुळे त्यांच्याकडून माझा फोन काही लागला नाही. हवलदार शिंदेंनी तर अगदी पार्लरचा कार्डवरचा देखील नंबर ट्राय केला. खूप मेहनत केली माझ्यापर्यंत पोहचण्याचा पण काही झाले नाही. शेवटी त्यांनी ठरवले की बॅंक डीटेल त्यात होते त्याच्या मार्फतच बॅंकेत चौकशी सोमवारी करायची. 

मुलुंड पोलिस स्टेशनला सध्याकाळी चार च्या दरम्यान गेले तर ते म्हणाले अशी कोणतीच वस्तु आमच्याकडॆ नाही आली. नोंदही नाही अशी काही केलेली बुक मध्ये.. आयला हे एकुनतर पुन्हा नर्वस झाले मी. पण धीर धरुन विचारला सर रात्री ११ च्या दरम्यान कोण होतं इकडे त्यांना माहित असेल. तर च्यायला त्यांना ते पण माहित नव्ह्ता काल रात्री कोणाची ड्युटी होती. पण मग नंतर दोनचार वह्या चाळत त्यांनी सांगितले हवलदार शिंदे होता काल. तुम्ही रात्री या ९ वाजता . मी म्हटला त्यांचा नंबर असेल तर द्या मला मी त्यांना विचारते. तर त्यांचा नंबरही नाही त्यांच्याकडे... मी त्यांना म्हटले बघा ना आजूबाजूला जरा काळ्या रंगाचे पाकिट असेल आणि माझं प्रेस कार्ड पण आहे त्यात. प्रेस कार्ड आहे म्हटल्यावर ते फाळके हवलदार पटकन आपल्या खुर्चीवरुन उठले आणि मला बसायला जागा दिली.( हाहाहा... मीडिया का कमाच ) मी त्यांना सांगितलं माझी युक्ती मिडिया कंपनी आहे त्याचे पण कार्ड आहेत त्यात. तिथेच सोबत असलेल्या हवलदार कोलते ने लगेच हेड ऑफिस ला फोन करुन हवलदार शिंदेची चौकशी केली... त्यांचा नंबर मिळतोय का प्रयत्न करायला लागले. पण नाही मिळाला.. पंधरा-वीस मिनीट वाट पाहिल्यावर मी निघाले तिकडून की सध्याकाळी मी येते सांगून. निघतेच तोच हवलदार फाळकेंचा फोन आला ... शिंदे चा नंबर मिळाला आहे आणि तुमचे पाकिट त्यांच्याकडेच आहे तर तुम्ही त्याच्याशी बोलून घ्या. जीवात जीव आल्यासारखं झालं मला ... शिंदे शी बोलनं झाला त्याचं एक वाक्या आवडलं मला... पोलिसांकडे तुमची वस्तु आली की ती तुम्हाला मिळणारच... तुम्ही काळजी करु नका वेळ मिळाला की या मी तुम्हाला देतो पाकिट. मग संध्याकाळी गेले शिंदे साहेब भेटले .. माझं पाकिट त्यांनी माझ्या समोर ठेवलं आणि बसा म्हणाले... चेक करुन घ्या सगलं सामान ठीक आहे का पैसे बरोबर आहेत का? नीट तपासा... सगळं काही ठीक होतं पण आता मनात एक प्रश्न येत होता. या शिंदेना पैसे किती द्यायचे त्यांनी माझं पाकिट मला परत केलय... पण पैसे का देऊ ते तर त्यांचं कामच आहे ना...आणि पाकिट तर मला अजित सर.. काळे सर आणि मत्युंजय मुळे मिळालं आहे ना... आणि आसं पोलिसांना पैसे का द्या? आणि मी दिले आणि त्यांनी घेतलेच नाहीत तर.. अशा असंख्य प्रश्नाचं काहून माजलं होतं डोक्यात. याविचारातच धन्यवाद बोलत पाकिट घेतलं आणि निघाले... पण त्याचे आभार मी दुसऱ्यादिवशी नक्कीच आठवणीने मानले.. त्यांना मी मिठाई घेऊन गेले होते त्यांच्यासाठी... त्यांनाही वाईट वाटले नाही आणि मला ही... ते म्हणालेदेखील अरे याची गरज नाही हे आमचं कामचं आहे... आजकाल रोज घरी येताना मुंलुडला ऑटो स्टॅण्ड जवळच चौकी असल्याने त्याची भेट होतेच कधीही गरज लागलीतर सांग असं हक्कानं म्हणतात. या सगळ्यात हरवलेलं पाकिट तर मला मिळालंच पण नव्याने काही नवीन माणसंपण मिळाली.... जुन्या ओळखी पुन्हा मिळाल्या. आभारी आहे मृत्युंजय...अजित..आदित्य... आणि अर्थात हवलदार शिंदे यांची....