ये गरमी.. नकोसा केलय या गरमीने मुंबईकरांना... ट्रेनची गर्दी, बसचा प्रवास अगदी नकोसा होतं सगळं. कधी एकदाचा पाऊस पडतोय. असंच सगळ्यानां वाटतेय... यंदाच्या वर्षी मुबंईकरांना पाऊस बऱ्याच वेळा हुलकावणी देतोय. आज येईल, आता येईल.. मस्त थंड थंड वातावरण निर्माण करुन हा पाऊस काही केल्या येत नाही... मग अजूनच घामाचा घमघमाट. यंदाचा पावसाळा मला तरी जामच बोर वाटतोय. का कुणास ठावूक.. पहिला पाऊस.. मज्जा.. फिरायला जायचं प्लॅन... काहीच जाणवत नाहीये, मन जागेवर नसल्याची जाणीव होतेय. पावसाच्या नावानेच चिडचिड व्हायला लागलीये यारर... हुश्श!
पावसाची सगळ्यांची परिभाषा वेगळी असते... पहिला पाऊस आणि पावसासोबत येणारी तुझी आठवण, पहिला पाऊस आणि मी... पाउस आणि एक कप चाय असं बरचं काही. यंदाच्या पावसात मी पहिल्यांदा खूपच भिजणार आहे, मी प्रेमात पडलोय... आणि ती मुलगी नाही म्हणाली. हा हा ! मला खूप आनंद झालाय यार मला हवी तशी मुलगी ती आहे. आणि मला तोच क्षण, तोच आनंद एन्जॉय करायचा आहे. असं माझ्या एका मित्राचा वैयक्तिक मत एकलं... पावसात रडणाऱ्याचे अश्रू दिसत नाहीत, म्हणूनच बहुतेक याला पावसात भिजून आनंद आणि दुखः व्यक्त करायचं असेल... त्याला समजवण्यासाठी मी म्हणाले, "तु नही तो कोई और ही सही" असा विचार कर आणि जास्त रडू नकोस, नाही तर मुंबईचा परत २६ जुलै व्हायचा. तो म्हणतो.. आपल्याला हवं असणारं व्यक्तीमत्व हवी असणारी प्रतिमा जी आपल्या नजरेत असते ती अचानक समोर आली ना.. की नाही रिप्लेस करु शकत आपण... अखंड प्रेमात बुडालाय हा पोरगा असंच पटकन जाणवलं... विषय इकडेच बंद केला मी मग.. मज्जा कर पावसात रे बाबा! प्रेमात पडल्यावर... पावसावरह प्रेम करणारी अशी बरीच उदाहरण असतात आपल्यातच...
![]() |
नसती उत्तरे द्यावी लागतात, वेड्यासारखं वागल्यावर...
पण वेड्यासारखं वागायल होतं, पाऊस पडायला लागल्यावर... <3
|
पावसाची मज्जा, पावसाची प्रत्येक सर जणु आपल्याचसाठी आहे असा विचार करणारी, तर पाउस म्हणजे ईईई... किचकिच, चिखल, सगळीकडे ओलं. अगदी नकोसा जीव होतो या पावसात असे विचार करणारे पण बरेच असतात... यंदा मी पण पाऊस न आवडणाऱ्या लोकांच्या कॅटॅगरीतच आहे बहुतेक. "कुछ फिल नही हो रहा यार, अब वो बात नही है", असं सारखं जानवतं. कधी कधी आपण काही गोष्टींवर व्यक्तच होत नाही. तसाच आहे यंदाचा पावसाळा माझ्यासाठी, ‘ना आनंद आहे ना दुखः’ मनात प्रेम आणि समाधान असेल तर माणूस नेहमीच आनंदी राहतॊ असा माझा आतापर्यंतच अनुभव... पण भावनाशून्य जग झालयं सगळं, भावनाचां खेळ इतका अनुभवलाय की स्वतःच भावनाहीन झालेय, आता एकांत हवा आणि तो एकांत शोधण्याची मनाची धडपड आहे फक्त... यंदाच्या पावसात एकांत मिळतोय का बघूया...
माझ्या मित्रांचे मस्त ट्रेकिंग प्लॅन चालू झालेत... रोज नवीन नवीन प्लॅन बनत आहेत.. बघू आता पाऊस नक्की कधी येतोय आणि प्लॅन किती यशस्वी होतोय यांचा... येरे येरे पावसा, तुला देतो पैसा... या गाण्याच्या स्वरात नाचणारी लहान मुलं बघायला मी नक्कीच आतुर आहे... लवकर ये रे पावसा... मला तुझी आठवण येत नसली तरी तुझी वाट बघणारे खूप आहेत.... ये लवकर !
F O R E V E R ...
No comments:
Post a Comment