![]() |
बच्चे मन के सच्चे ... |
'मे'
महिना म्हणजे सुट्टीचा महिना, `आया मौसम डर्मी कुल का' हे शब्द हमखास कानावर
पडतातच. उकाडा, गर्मी ने हैराण सगळे…सगळ्यामध्ये निवांतपणा, शांतता,
बोजडपणा आल्याचा अनुभव असेल…कामातपण कंटाळा आलाय. पण "इस बार कुछ नया है
यह!" यंदा आमच्याकडचा 'मे' महिना जरा जोरातच आहे. रूपा म्हणजे माझी आते
बहिण हिचं 'लग्न', आता हे घरचं लग्न तर धम्माल येणारंच…जरासं वेगळं
वातावरण तर आहेच…आमच्या इकडच्या लहान मुलांचा तर कल्लांच आहे. रूपा एकदम
भारीच आहे, आमच्या इमारतीत काही ही कार्यक्रम असो रूपा सगळ्या मुलांना
प्रोत्साहन देण्यास एक नंबर… पूजा असली की लहान मुलांना डान्स
शिकवण्यापासून त्यांचा मेकअप करणं, त्यांना वेगवेगळे गेम्स खेळायला शिकवणं
सगळं काही भारीच करते ती. म्हणूनच सगळ्यांची आवडती ताई आहे ती… या ताईच्या
लग्नासाठी आम्ही सगळेच फार उत्सुक आहोत…
इतकेच नव्हे तर जोक्स सांगत होतो सगळे तर एकीनं सांगितलं… कॉलेजकी लडकी... मारती है धक्का …नही दिया मुका... तो बोलती ही छक्का…. अरे बापरे असे जोक्स मी तरी अजून ऐकले नव्हते. हसून हसून वेडे झालो आम्ही सगळे. अजून एक किस्सा झाला, काकाचा मुलगा आलाय गावावरून इकडे , एका रात्री त्याच्या अचानक खूपच पोटात दुखायला लागलं खूपच रडत होता. त्याला डॉक्टर कडे घेऊन जायला निघाले तर म्हणतो. नको नको मला बाळ नको, मला नाही जायचं डॉक्टरकडे. हा हा हा हा !!! खरंतर नुकतेच आमच्या घरी एक बाळ झालंय . काकीच्या पोटात दुखायला लागल्यावर तिला डॉक्टरकडे नेले आणि तिला बाळ झालं हे त्याने पहिलं होतं बहुतेक. तर पोटात दुखतंय म्हणून दवाखान्यात नेलं आणि बाळ झालं काकीला इतकंच त्याला माहित असावं. आम्ही या किश्श्या वरुन प्रचंड हसलो .
आजकालची लहान पोरं खरंच खूपच फास्ट झाली आहेत. मोबाईल तर सर्रास वापरतात, ही लहान मुंलांबरोबरची संध्याकाळ भन्नाटच होती. आता अजून खूप वेळ आहे माझ्याकडे या चिल्ल्या- पिल्ल्यांसोबत वेळ घालवायला … कारण पूर्ण मे महिना बाकी आहे आता… निखळ मज्जा आणि नवीन काहीतरी शिकायचं असेल ना तर तुम्ही पण नक्की कधीतरी असा लहान मुलांमध्ये वेळ घालवून बघा… स्वतःला किती फ्रेश फिल कराल.
चला इतकच … मला लग्नाची तयारी करायची आहे … लग्नाची धम्माल लवकरच लिहिन… आमच्या लाडक्या ताईच्या लग्नाला या हा !
F O R E V E R ...
F O R E V E R ...
No comments:
Post a Comment