भ्रष्टाचार...
 |
बापूंची’ छबी |
मंगळवार, वेळ- सकाळी ११.१५, स्थळ : माहीम स्टेशन... एक पोलिसांची बोलेरो जीप येते. पाठोपाठ कानात टिपीकल मारवाडी बाळी घातलेला चहावाला धावत येतो. जीपमध्ये पोलीस ड्रायव्हर, एक अधिकारी आणि एक शिपाई असे तिघे असतात. चहावाला आपल्या जवळची डायरी खिडकीशेजारी बसलेल्या अधिकाऱ्याला देतो. पाठीमागच्या सीटवर बसलेला शिपाई त्या चहावाल्याला काहीतरी पुटपुटतो. तो पर्यंत अधिकारी त्या डायरीत काहीतरी लिहून चहावाल्याला डायरी परत करतो. त्यानंतर तो अधिकारी मोबाईलवर बोलत असणाऱ्या पानवाल्याला इशारा करतो. पानवाला मोबाईलवरच बोलत हातात डायरी घेऊन येतो. त्या डायरी मध्ये असते ‘बापूंची’ छबी असलेली शंभराची नोट. डायरी अशाकरिता की जी कोणी पोलिसांची गाडी येईल ती पैसे घेऊन गेल्याची नोंद त्यामध्ये होते, कारण अशा भरपूर गाड्या या परिसरात फूटपाथवर बसणाऱ्या फेरीवाल्यांकडून पैसे उकळतात. बेकायदेशीर धंदे लपविण्यासाठी मार्ग वापरला जातो तो देखील...बेकायदेशीरच. शेवटी काय हो, बडी मछली, छोटी मछली को खाकर ही बडी होती है...है ना...! आता प्रश्न असा आहे की अण्णांच्या आंदोलनाचा तो प्रभाव संपला का? हातावर पोट असणाऱ्या लोकांसाठी लोकपाल काय करणार? ‘मी अण्णा’ चे ते भूत फक्त आझाद मैदान वा रामलीला मैदानापर्यंतच सिमीत होते का?
No comments:
Post a Comment