Wednesday, January 15, 2014

मै जिंदगी का साथ निभाता चला...


मै जिंदगी का साथ निभाता चला, हर फिक्र को धुए में उडाता चला... रफीचं हे सदाबहार गीत एफएम वर ऐकत होते. काय जबरदस्त गाणं आहे. लाईफचा फण्डा साहिर लुधियानवीनं एवढा भारी मांडलाय की हजारो पुस्तकं हे ज्ञान सांगायला कमी पडले असते. स्पेशली देव आनंद ज्या पद्धतीने सिगरेट टाकतो ना तेव्हाच नकळत आपलं मन त्या सिगरेटशी तुलना करु लागतं. आपलं मन... अगदी त्या गाण्यातल्या सिगरेट सारखं... कोणीही यावं, शिलगावं आणि निघून जावं. आपण मात्र आनंदीत असतो कि कोणीतरी आपल्या मुळे हिरो म्हणवून घेत असतो. मात्र त्यावेळी आपण हे विसरतो की आपल्यासाठी तो एकमेव हिरो असतो आणि त्याच्यासाठी अशा कितीतरी सिगारेट्स.

प्रत्येकाच्या आयुष्याचं थोड्याफार फरकानं असंच असतं. पण सगळेच त्या हिरोच्या हातातलं थोटूक बनून स्वत:ला संपवत नाही तर वेगळा पर्याय निवडतात. कदाचित यालाच प्रॅक्टिकल लाईफ असं म्हणत असतील. प्रॅक्टिकल लाइफ जगताना सॉलिड मज्जा येते. कोणत्याही भावना नाही. काही अटॅचमेंट नाही फक्त आपलं आयुष्य जगायचं... कोणाचाच विचार करायचा नाही... फक्त मी,  माझं, यावर संपूर्ण जग... प्रॅक्टिकल लाईफ जगण्याचा निर्णय आपण तेव्हाच घेतो, जेव्हा कधीतरी, कुठेतरी मन सॉल्लिड दुखावलेले असते. मग आपणही तयार होतो दुसऱ्याचं मन दुखवायला... मग आपल्याला देखील काही वाटत नाही कारण आपण फक्त स्वत:चाच विचार करतो... मग आपण जगायला लागतो, दुनिया गयी भाड में...अपुन अपने मुड मै...!स्टाईल ने... 
स्वतःच्या भावना  कोणीतरी दुखावल्या की, बदला घेण्यासाठी आपण दुसऱ्याच्या भावना दुखवायच्या आणि समाधान मिळवायचं... आपण खूपच हॅपी आहोत... समाधानी आहोत... खूष आहोत असं खोटं खोटं वागायचं... आपण दुसऱ्याच्या सुखात स्वतःचे सुख शोधणारे होतो, पण आता दुसऱ्याच्या दु:खात सुख शोधायला केव्हापासून लागतो हे आपल्यालाच कळत नाही. मन आपलं असं काही फुलपाखरु बनलंय की फक्त आपण आता मस्त स्वच्छंदी जगायला लागतो. सगळीकडे सगळं काही मस्त मस्त असलं तरी... खरं तर आपण एकटेच असतो. फक्त एकटे आणि आपल्या सोबत असते आपले एकटेपण...

आपल्या भावना, आपलं मन कोणीतरी तोडावं आणि आपण त्याच्यासाठी स्वतःला इतक बदलावं... हे जरा अतीच होतं... आपला स्वभाव, आपल्या भावना, आपलं मन हे जितकं निर्मळ, निरागस, निरपेक्ष तितकेच आपण सुंदर आणि आनंदी असतो...

माझ्या ना नेहमी मनाचं आणि बुद्धीचं जोरदार भांडण चालू असतं... बुद्धी नेहमीच चांगलं सांगते पण त्यात समाधान नसतं... मन नेहमीच फुलपाखरुबनून धावत असतं आणि त्याचंच ऐकायला मज्जा येते... मनाचं म्हणजे दिल की बात ऐकल्यावर जे काही सुख मिळतं ना,हाहाहा... ते शब्दात व्यक्तच होऊ शकत नाही. चेहऱ्यावरचं हसू आणि डोळ्यातलं रडू दोन्ही नक्की काय असतं हे दिल की बातऐकल्यावर आणि तसं केल्यावरच कळतं... अभी अभी दिल की सुनी है, अभी ना करो जमाने की बात... या गाण्याची आठवण झालीच. 

आपल्याला  नेहमीच आनंदी राहायला आवडतं. पण प्रत्येक वेळी निर्णय मनाचा विचार करुन  घेत नाही, प्रॅक्टिकल विचार करायला लागतोच. बहुतेक वेळा बुद्धीने घेतलेले निर्णय कठोर असतात पण आपल्याला लॉंन्ग टर्मसाठी फायद्याचे असतात. मनाचे निर्णय क्षणिक सुखाचे असतात पण लॉंन्ग टर्मसाठी दुःखाचे पण होतात. यार सगळं काही माहित आहे मला पण  इस दिल क्या करु?’ अस्सं मला आणि तुम्हालापण वाटलच असेल ना आता...

बस्स मी ठरवलय, मला कोणीही कितीही दुखावलं तरी मी जशी आहे तशीच राहणार ... मला वाटतं तस्सच जगणार आणि वागणार... हसत हसत इतकचं म्हणायचं यार अगर तुम्हारे जैसे दिल तोडनेवाले होगें तो हम हजार बार अपना दिल तोडने तुम्हारे पास आयेंगे!आपल्या प्रत्येक क्षणात जगण असतं... दिल की बात  कल्यावर क्षणिक सुख जरी आयुष्यात आलं तरी तो लाईफचा बेस्ट टाईमअसतो. जो आपल्याला आयुष्यभरासाठीचा सोबती म्हणून राहतो...त्यालाच आपण सुंदर आठवणी म्हणतो. डोळे बंद केल्यावर एका क्षणात आपल्याला रिफ्रेश करणारे क्षण डोळ्यासमोर येतात तोच आपला बेस्ट टाईम’ ...    

प्रॅक्टिकल लाईफ जगता जगता स्वतःला हरवून बसण्यापेक्षा, स्वतः मस्त आनंदी आणि जसे आपण आहोत तसेच छान छान जगायचं.      
    
F O R E V E R...  



1 comment:

  1. खुप सुंदर आहेत आपले सर्व ब्लॉग

    ReplyDelete